पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ श्रीमंतांशिवाय किंवा आस्थेवाईक विद्यार्थ्यांशिवाय इतरांस सुलभ नव्हते. म्हणून ते बारामतीस असतांही कोल्हापूर, क-हाड, पंढरपूर फार काय पण काशीहूनही ग्रंथ आणवीत. कांहीं वाचून परत करीत व कांहींच्या नकला घेत. अनेक ग्रंथांचा शोध लावून ते संपादन करीत. त्यांची | लेखनक्रिया सारखी चाललेली असे. त्यांची ही लेखन क्रियाच त्यांच्या ग्रंथ रचनेच्या कामी पुष्कळ उपयोग पडली. कारण लेखनक्रियेने आयासावांचून सहज पाठांतर घडते, व अध्ययन चांगले परिपक्व होऊन मुरते. त्यांचा विद्याव्यासंग दांडगा होता म्हणूनच त्यांच्या कविता | इतक्या सरस वठल्या आहेत. संस्कृत नाटके, काव्ये, वैद्य शास्त्र, वेदांतशास्त्र, व्याकरण-शास्त्र वगैरे वरील अनेक ग्रंथांचे त्यांनी चांगले परिशीलन केलेले होते. रामायण भारत व भागवत हे ग्रंथ तर त्यांना पुराण सांगून सांगून करतल मलंवत् झाले होते. त्याचप्रमाणे त्यांनी मुकुंदराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, वामन, श्रीधर, नामदेव, तुकाराम, मुक्तेश्वर महिपती वगैरे मराठी कवींच्या कविताही चांगल्या वाचलेल्या होत्या. त्यांनी हिंदी भाषेतील तुलसीदासाचे रामायण व कबिराचे दोहरे वगैरेही वाचल्याचे | दिसून येते. इतके करून त्यांनी सुमारे एक लाख उत्तम | मराठी कविता लिहिलेल्या आहेत. याप्रमाणे सर्व बाजूंनी त्यांचा व्यासंग तीन तांपेक्षा अधिक वर्षे अव्याहत चालला होता.