पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असे बोलून ते दोघेही राजाकडे गेले, आणि सर्व वर्तमान त्यांनी राजास सांगितले. राजाने ते सर्व ऐकून घेऊन तत्क्षणींच दरिद्री विद्वानास आपल्या जामदार खान्यांतील धन देऊन धनवान् केले, आणि सूखास म्हणाला १६ अरे, जर तुला या क्षणी धनाप्रमाणे विद्या देता आली असती तर ती मी तुला आतांच देऊन विद्वान् केले असते. परंतु तसे मला करता येणे शक्य नाहीं, आतां तुला जर विद्वान् होण्याची इच्छा असेल तर ते शाळेत जाऊन झटून विद्याभ्यास कर, म्हणजे काही काळ गेल्यानंतर ते विद्वान् होशील, वा त्यामुळे तू प्रतिष्ठा पावशील... सारांश, विद्यमुळे विद्वानास धन वाटेल तेव्हां सहज मिळणे शक्य असते. पण विद्याहीनास विद्या सहज आयत्या वेळीं मिळत नाही. तीस वर्षानुवर्ष अभ्यासच केला पाहिजे. करितां मुलांनी लहानपणापासूनच विद्या संपादण्याविषयीं झटत असावे, मोरोपंतांचा विद्यासंग, -- -- मोरोपंत ह्मणून एक सुप्रसिद्ध कवि अठराव्या शतकांत महाराष्ट्रांत होऊन गेले, हे सर्वास माहीत आहेच, त्यांचा विद्याव्यासंग फार जबर होता. त्यांनी विद्यार्जन स्वतःच केले. त्यांचे वाचन सतत चालले असे. त्यांच्या वेळी हल्ली सारखे ग्रंथ मिळणे सुलभ नव्हते, कारण तेव्हां छापण्याची कला इकडे निघाली नव्हती. तेव्हां ग्रंथ, जवळ असणे हे