पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ दिवशी त्या दोघांसही सभेचे बोलावणे आले. तेव्हां ते दोघेही सभेस गेले. तेथे त्या उभयतांचे खरे स्वरूप ओळखले गेले. म्हणून सभेतील लोकांनी विद्वानाचा मात्र योग्य आदरसत्कार केला. ते पाहून त्या मूर्ख धनवानास फार वाईट वाटले. तेव्हां तो आपल्या मनांत म्हणाला, अरे, मी मूर्ख कसा झालों! जर मी विद्वान् असत तर सर्व लोकांना मला मान दिला असता. मी धनवान् आहे खरा; परंतु धन माझ्याबरोबर सभेस येत नाहीं. विद्या सर्वत्र बरोबर जाते. म्हणून आजपासून माझे सर्व धन खर्चुन विद्या संपादण्याविषयों मी प्रयत्न करीन, असा त्याने तेथे त्या वेळी आपल्या मनाशी निश्चय केला. मग सभा उठल्यावर ते दोघे घराकडे परतले. वाटेनें धनवान् विद्वानास म्हणतो, * मित्रा, जर तू मजवर कृपा करशील तर आपणा उभयतांचे कल्याण होईल,' विद्वानाने विचारलें * ते कसे ? ' मूख बोलला ६ माझे सर्व धन ते घे आणि तुझी सर्व विद्या मला दे.' विद्वान् म्हणाला “तू मला आपले सर्व धन या घटकेस देऊ शकशील; ह्यांत कांहीं कठीण नाहीं. परंतु मला मात्र माझी सर्व विद्या या क्षण तुला देतां येणार नाही. कारण तसे करणे, माझ्या शक्ती-बाहेरचे आहे. त्यावर तो धनवान् मूर्ख म्हणाला अरे मी द्रव्याचा लोभ सोडावयास सिद्ध झालों, आणि तुला विद्येची ममता सुटेना काय? ' विद्वानाने उत्तर केले ह्या विषयी मी सांगितल्याने तुझी खातरी व्हावयाची नाहीं. करितां आपण दोघेही राजाकडे जाऊ या, म्हणजे तो या गोष्टीचा निवाडा करील. "