२४ कला, प्राणिशास्त्र, व वनस्पतिशास्त्र वगैरे नानाविध शास्त्रांच्या अध्ययनाने व वाचनाने बुद्धीचा चांगला विकास होतो, ज्याला उत्तम ग्रंथकार व्हावयाचे असेल त्याला तर नेहमी विविध वाचनापासून चांगलाच उपयोग होतो. कारण अशा वाचनापासून त्याच्या लेखनकलेस बरेंच सहाय्य होते. नवीन विचार, नवीन आचार, नव्या कल्पना वैगरे हरएक बाबींचे ज्ञान त्यास मिळते. व त्या ज्ञानाचे प्रतिबिंब त्याच्या ग्रंथांत उतरून तो ग्रंथकार सर्वमान्य होऊन त्याची विद्वानांत गणना होते. सारांश कोणत्याही एका विषयांत पारंगतता मिळविणे व दुस-या अनेक विषयांत थोडाफार प्रवेश करणे यांसच विद्वत्ता व पूर्ण शिक्षण म्हणतात. अशा त-हेच्या विद्याव्यासंगापासूनच बुद्धीचा विकास होऊन ज्ञानार्जनाची लालसा वाढत जाते. करितां प्रत्येकानें कोणता तरी विद्याव्यासंग नेहमी करीत असावे. हे त्यास अत्यंत भूषणावह आहे.
- एक श्लोक, किंवा अर्धा श्लोक, किंवा त्याहूनही कमी अक्षरे प्रतिदिवशीं शिकावी. दानधर्म, अध्ययन, व सत्कर्म यांच्या योगाने प्रत्येक दिवस फलद्रुप करावा,
सुभाषित. दरिद्री विद्वान् आणि धनवान् मूर्ख. - - एकदां एक दरिद्री विद्वान् आणि एक धनवान् मूर्ख ह्यांचा फार स्नेह पडला, यामुळे बहुतेक लोकांस असे वाटले की, विद्वानाचा तो स्नेहीही विद्वान् असेल. म्हणून एके