अन्य विषयांविषयी अज्ञानांधकारांत राहिल्यास त्यास पारंगतता म्हणता येणार नाही. विशेषतः श्रेष्ठ प्रतीच्या उद्योग धंद्यांत या गोष्टीची प्रचीति प्रत्यक्ष अनुभवास येते. वकिलास कायद्याच्या ज्ञानाबरोबर इतर सर्वसाधारण विषयांचे सामान्य ज्ञान मिळाले असल्यास तो फार चांगल्या प्रतीचा वकील ठरतो. कारण अनेक प्रसंगी अशा गहन व व्यापक प्रश्नांचा वकिलास खल करावा लागतो की, त्यास केवळ कायद्याचेच उत्तम ज्ञान पुरेसे होत नाहीं तर अनेक अन्य विषयांचे साधारण ज्ञान त्यास अवश्य लागते. त्याचप्रमाणे वैद्याला जसे निरनिराळी औषधे व त्यांची रसायने यांचे गुण व रोगाचे निदान व चिकित्सा यांचे ज्ञान असणे अवश्य आहे तसेच मानवी स्वभाव व मानवी अंतःकरण यांचीही पूर्ण ओळख असणे जरूरीचे आहे. धार्मिक, सामाजिक व राजकीय विषयांवर व्याख्याने देण्यास तर दुस-या सर्व विषयांवरील सामान्य ज्ञानाची अत्यंत अवश्यकता आहे. कारागीर, इंजिनीअर व व्यापारी वगैरे धंदेवाले लोकांस वाङ्मय, साहित्यशास्त्र कलाकौशल्य वगैरे विषयांच्या अध्ययनापासून शारीरिक व मानसिक सौख्य प्राप्त होईल यांत संशय नाहीं. गायनाची प्रत्यक्ष व्यवहारांत उपयुक्तता दाखविणे जरी कठीण आहे तरी त्यापासून मनावर जे अनेक उपयुक्त परिणाम होतात त्याचे महत्त्व जास्त आहे. गायनकलेने आपल्यांत एकवाक्यता येते. आपले डोके शांत होते. दमलेल्या व थकलेल्या माणसास गायन ही एक मोठी करमणूक आहे. प्राचीन व अर्वाचीन भाषाज्ञान, चित्रकला, गायन
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/31
Appearance