२२ पण खरोखर म्हटले तर त्या वेळी शिक्षणास कोठे नुकती सुरवात होते; व मनुष्याच्या अंतापर्यंत ते चालूच असते. विद्याव्यासंग करण्यास अमुक वय, अमुक काळ व अमुक संपत्ति लागते असे नाही. तो कोणत्याही काळी गरीब व श्रीमंत या दोघांनाही सारखाच करता येतो. फक्त एक दृढ निश्चय मात्र पाहिजे. लहान वयांत विद्वान् होतां आलें तर फारच चांगले. पण तसे होणे सर्वास शक्य नाहीं. पण थोर वयांतसुद्धा विद्याव्यासंगानें पंडीत व विद्वान् होतां येते. आजवर जे नामांकित विद्वान् होऊन गेले आहेत त्यांपैकी बहुतेकांनी थोर वयांतच विद्या संपादन केलेली आहे. याची उदाहरणे प्राचीन व अर्वाचीन इतिहासांत पुष्कळ सांपडतात. विद्वान् लोक विद्यवर जे परिश्रम करीत असतात त्यांबद्दल लोकांनी आपणांस मान द्यावा किंवा त्यांपासून आपणास द्रव्य प्राप्ति व्हावी; ही गोष्ट त्यांच्या मनांत सहसा वागत नाहीं. प्लेटो, आरिस्टाटल, पाणिनी, भास्कराचार्य, रा. बा. केरो लक्ष्मण छत्रे, विष्णुशास्त्री चिपळूणकर वैगेरे यांसारख्या विद्या •व्यसनी पुरुषांस आपआपल्या विद्येत गर्क होऊन रहाणे व आपल्या शोधांनी मनुष्यमात्राच्या सुखवृद्धीचा अभिलाष धरणे याहून कांहीही इष्ट नसते. असे थोर पुरुष ज्या विषयांच्या मागे लागलेले असतात त्यांत गुंग होऊन गेले म्हणजे त्यांस कशाचेही भान रहात नाहीं. | सर्व विषयांवरील सामान्य वाचन व ज्ञान हे आपल्या अंगीकृत म्ह० हाती घेतलेल्या विषयास नेहमी उपयोगी पडते. आपल्या धंद्यांत तेवढे प्रावीण्य मिळवून बाकीच्या
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/30
Appearance