Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ पार पाडणेकरितां संसारांतील इतर कर्तव्येही त्यांस करावीं लागतच असत. परंतु हे असले मागे कितीही उपद्याप असतांनासुद्धां फावलेला वेळ ते विद्याव्यासंगांत घालवीत व विद्येत भर घालीत असत. कारण त्यांना विद्येची तशी गोडीच लागलेली असे. यामुळे ते नेहमी विद्याध्ययनांत फुरसतीचा काळ घालवीत व वाचून वाचून व मनन करून ते विद्वान् झाले होते. अशा त-हेनें मनुष्य एकदां विद्वान् झाला म्हणजे त्याची कीर्ति चोहोकडे पसरते, तो सर्वत्र वंद्य व पूजनीय होतो. त्याची सर्वत्र प्रतिष्ठा होते. सर्व लोक त्यांस मान देऊ लागतात. संपत्ति त्यास मिळू लागते. संस्कृतांत एके ठिकाणी म्हटले आहेः-* स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते” ( म्हणजे राजे लोकांना मान फक्त त्यांच्या राज्यांतच मिळतो पण विद्वान् मनुष्याला तो सर्वत्र ठिकाणीं। मिळतो. ) हे अगदी खरे आहे. याचा अनुभव आपणास नित्य व्यवहारांत येतोच. प्रत्येक मनुष्यास राजा किंवा लहान मोठा अधिकारी होणे शक्य नाही. परंतु प्रत्येक मनुष्यास विद्याव्यासंग चालू ठेवून कोणत्या तरी विषयांत . प्राविण्य मिळविता येईल. म्हणून प्रत्येकाने आपला फुरसतीचा वेळ आपणास आवडणाच्या विषयावरील व सर्व साधारण उपयुक्त पुस्तके वाचण्यांत घालवावा हैं उचित आहे. कारण मनुष्य स्वतःच्या प्रयत्नाने जे शिक्षण मिळ. |वितो ते जसे त्याच्या अंगी बाणून जाते, तसे दुसन्याचे शिक्षण अंगी बाणत नाहीं. पुष्कळांची अशी कल्पना असते की, शाळा सोडली म्हणजे आपले शिक्षण संपलें,