पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० नित्य भर पडत जाते. अशा त-हेने ज्ञान वाढले म्हणजे तो सर्व सृष्टीतील पदार्थाकडे चिकित्सक बुद्धीने पाहू लागतो. व अशा त-हेनें तो पाहू लागला म्हणजे सृष्टीच्या रचनेत परमेश्वराने जे आपले अगाध चातुर्य योजिले आहे ते त्याच्या दृष्टीस पडू लागते. त्यामुळे तो ईश्वरचरणीं जास्त लीन होऊन प्रशांत व गंभीर होतो. विद्याध्ययनापासून मनाला आनंद होतो. भाषणाला शोभा येते व बुद्धि वाढते, एकांतवासांत व निवांतस्थळ असतां मनाची करमणूक करण्याला विद्या हेच मुख्य साधन आहे. प्रत्येक कामाचा विचार करून त्याची तेथे योजना करण्यास विद्येचा फार उपयोग होतो. विद्याध्ययनानें अंगीं उपजत असलेले गुणधर्म परिपक्व होतात. कारण उपजतबुद्ध ही आपोआप उगवलेल्या झाडांप्रमाणे आहे. तिची जर नीटनेटकी व्यवस्था केली नाही व तिला विद्येने योग्य वळण लाविलें नाहीं तर तिचा विस्तार अस्ताव्यस्त होऊन ती प्राणिमात्राच्या सुखांत भर घालण्याऐवजी ती त्यांच्या सुखाच्या आड मात्र कारणपरत्वे येण्याचा संभव फार असतो. विद्यनें बुद्ध विशाल होते, दृष्टीला व्यापकता येते व विचार प्रगल्भ होतात. म्हणून जे विद्याव्यासंगांत काळ घालवितात त्यांमच विद्वान् ही संज्ञा प्राप्त होते. विद्वान् ही संज्ञा प्राप्त होणसाठीं मनुष्याने इतर सर्व उद्योगधंदे सोडून विद्येच्याच पाठीमागे लागले पाहिजे असे नाहीं. आजवर जे नामांकित विद्वान् होऊन गेले त्यांपैकी पुष्कळांच्या मागें संसार हा लागलेलाच होता; व तो यथासांग