पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ ( ३ ). विद्याव्यासंग. -LR0 विद्या ददाति विनय, विनयाद्याति पात्रताम् ॥ पात्रत्वाद्धनमामोति, धनाद्धर्मस्ततः सुखम् ।। भावार्थ-विद्या विनय देते (शिकविते) विनयापासून अंगीं पात्रता उत्पन्न होते, पात्रतेपासून द्रव्य मिळते, द्रव्यामुळे हातून धर्म घडतो व धर्मापासून सुख होते. सारांश, विद्यादेवीला एकदां प्रसन्न करून घेतले म्हणजे तिच्यापासून सर्व कांहीं मिळते. मनुष्ये अनेक प्रकारचे उद्योग करून कालक्रमणा करितात. परंतु त्या सर्व उद्योगांमध्ये विद्याव्यासंगांत काल घालविण्यासारखा उत्तम उद्योग दुसरा कोणताही । नाहीं. या व्यवसायांत जे समाधान आहे त्यापेक्षां विशेष समाधान दुस-या कोणत्याही व्यवसायांत नाहीं. विद्याव्यासंग हा शाश्वतसुख प्राप्त करून घेण्याचा राजमार्गच आहे. विद्येने मनुष्याचे अंगां एक प्रकारचे दिव्य सामथ्य व तेज उत्पन्न होते. विद्येने सत्यदेवतेचे प्रसन्न व सुंदर मुख दृष्टीस पडते. विद्या ही एक प्रकारची तेजस्वी शक्ति आहे. विद्येच्या योगाने पुढे कल्याण होते, हे तर उघडच आहे, परंतु विद्याभ्यास चालू असतांनासुद्धा सुख होते. नवीन नवीन गोष्टी समजू लागतात. मागें ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या कळल्या म्हणजे जो एक प्रकारचा आनंद होतो तो तर अवर्णनीय आहे. विद्येने ज्ञानांत