पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ पुढे ठेऊन ते त्यास उघडण्याविषयी त्याने सांगितले. त्याने ते उघडलें तो त्यांत बापाच्या मालमत्तेचे सर्व कागदपत्र त्याच्या दृष्टीस पडले. मग धाकट्या भावाने वडील भावास सांगितले की, “ सांप्रत तू आपली वर्तणूक सुधारली आहेस; ही अशीच जर आपल्या बापाच्या दृष्टीस पडती, तर त्याने ही दौलत खचित तुला दिली असती; सबब ही आतां मी तुझ्या स्वाधीन केली आहे. हे पाहून त्या वडील भावास किती आनंद झाला असेल, व तेथे जमलेल्या मंडळीस ते विलक्षण बंधुप्रेम पाहून किती आश्चर्य वाटले असेल, याचा विचार वाचकांनीच करावा !