पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ दे, आणि तू आपल्याला अंडी ठेव.' असा त्यांचा वाद चालता चालतां हातघाईवर प्रकरण यऊन, एकमेकांच्या शेंड्या ओढू लागले. भांडण्याच्या गडबडीत थोरल्या भावाजवळून मादी निसटून गेली. आणि धाकट्याने गैर सावधपणांत ती अंडी तुडवून टाकलीं, शिल्लक कोणासच कांहीं राहिले नाही. असे पाहून परस्परांस ते म्हणाले 4 आपल्या बाबांनी ( खाली लिहिलेले ) जें काय वचन सांगितले आहे, ते अगदी खरे आहे. । | ** प्रेमद्वारे प्रत्येकजण आपला वांटा मिळवील. कलहाने हरएकजण तो खचित गमवील. बंधुप्रेम.

  • ** रामराव पाटील म्हणून एक मोठा जमीनदार होता. आपले पूर्व वयांत मोठा उद्योग करून त्याने स्वकष्टानें। पुष्कळ जमीनजुमला संपादन केला होता. त्याचा वडील मुलगा दुर्गुणी निघाला, सबब त्याने आपली सर्व मालमत्ता धाकट्या मुलास दिली. पुढे वडील मुलास पश्चात्ताप होऊन त्याने आपले दुर्गुण टाकून दिले. व चांगल्या रीतीने वागू लागला. त्यावरून त्याच्या धाकट्या भावाने एके दिवशी मेजवानीचा बेत करून आपल्या भावासही जेवावयास बोलाविलें. मग पक्कानांनी भरलेली ताटे सर्व मंडळींपुढे ठेविल्यावर एक झांकलेलें ताट आपल्या भावा