पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ च्या ठिकाणी चार दिवे लागू लागले. एकत्र असतां गांवांत जो बस व कुळांवर वचक होता ते ढिला पडला. वसुलाकरितां एका गांवीं एका शिपायाच्या ऐवजी चौघांचे चार शिपाई जाऊ लागले. यामुळे साहजिकच खर्च वाढला व प्राप्ति तर मुळीच वाढली नाहीं. हे सर्व बंधू एकत्र असतां त्यांच्या घरी स्वयंपाकाला बाई, पाणी भरण्यास ब्राम्हण, पूजेस भटजी, व लिहिण्यास एक कारकून असे, विभक्त झाल्यावर प्रत्येकास इतके नोकर ठेवणे अगदी अशक्य झाले. यामुळे त्यांना व त्यांच्या बायकांना घरांतील सर्व हलकींसालकी कामेसुद्धा स्वतः करणे भाग पडले. शिवाय खर्च तिप्पट लागला तो लागलाच, तेव्हां त्या मंडळींपैकी एक वृद्ध गृहस्थ त्या चौघां भावांस म्हणाला “ तुम्हीं विभक्त होऊन काय मिळविले १११ यावर ते चौघेही निरुत्तर झाले. तित्तिरपक्ष्याचे घरटें. - - - जंगला लगतच्या एका शेतांत दोघां भावांस एक तित्तिरपक्ष्याचे घरटे आढळले; त्यांतील अंड्यांवर मादी बसली होती ती त्यांनी हलकेच जाऊन धरली. . त्यांत जो मोठा भाऊ होता तो धाकट्यास म्हणाला, “तू अंडी घे, मी आपल्याला ही मादी ठेवतों; अंडीं कांहीं कमी नाहीत, ती मादीच्या किंमती बरोबरीनेच आहेत. लहान भाऊ म्हणाला, ** असे आहे तर, मला मादी