पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ मुळे सकस व प्रबळ अशीं राष्ट्रांत असली की राष्ट्राचेही संघबळ वाढते. पूर्वापार चालत आलेले सुसंस्कार व चालीरीति यांनी ज्या घराण्याला दृढ धरिलें आहे ते घराणे सर्वदा सुखी असते. ह्मणूनच मोरोपंत म्हणतात:- | यश सुख पुण्य मिळे, मग बंधूनीं। कां न नीट नांदावें १ ॥ ( आदीपर्व. ३६ ) विभक्त होऊन काय मिळविलें? -

  • -

कोंकणप्रांतीं एका डोंगराच्या पायथ्याशीं एक टुमदार गांव आहे. तेथे रामराव देशमुख म्हणून एक खानदानीचे गृहस्थ होऊन गेले. त्यांच्या पश्चात् थोडेच दिवसांत, त्यांचे चार मुलगे विनाकारण विभक्त झाले. त्यांनी आपआपली शेतवाडी व कुळेंडाळे वाटून घेतली. त्यांच्या येथे जमाखर्च ठेवीत असत. त्याजवरून वर्षाचे वर्षास प्रपंचास लागणाच्या खर्चाचे टाचण ते करीत असत. | एके दिवशी त्यांच्या वडिलांची चार स्नेही मंडळी, आपआपला नित्याचा व्यवसाय आटापून चांदण्यांत शिळोप्याच्या गप्पागोष्टी करीत बसली असता, त्या चारी बंधुंचीं जमाखर्चाची टांचणे एके ठिकाणी आणवून पाहिली. तेव्हां ते एकत्र असतांना जो खर्च होत असे, त्याच्या तिपटीने अधिक खर्च लागल्याचे त्यांच्या नजरेस आले, कारण एका चुलीच्या चार चुली झाल्या, व एका दिव्या