पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्याने धाकट्या भावाचा लोकांत मान राहातो. त्याचप्रमाणे धाकट्या भावाने वडील भावाची मर्यादा राखणे हैं। उभयतांसही भूषणास्पद आहे. असे वागण्याने वेगळे राहाण्याचा प्रसंग टळेल. व आपल्या हिंदुसमाजांत फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या अविभक्त कुटुंबपद्धतीचे पोषण केल्यासारखे होईल. । कारण ती पद्धत फार चांगली आहे. या पद्धतीप्रमाणे झटले झणजे घरांतील वडील पुरुघ–मग तो बाप, चुलता किंवा भाऊ-कोणीही असो, हा घरांतील खरा यजमान असतो, व इतर सर्व मनुष्ये त्याच्या तंत्राप्रमाणे चालतात. मोठे कर्ते भाऊ झाले तरी ते वडील भावाचा बापाप्रमाणे मान ठेवतात. मुलगा मोठा वयस्कर, विद्वान् व अधिकारसंपन्न झाला तरी घरांत वृद्ध बाप आहे तोपर्यंत त्याला आपली सत्ता घरांत चालवावी असे वाटत नाही. त्याला जेवावयाचे बाहेरचे आमंत्रण आलें तरी तो ते स्वतःन घेतां बापाकडे जावयाला सांगतो. त्याची कर्ती सवर्ती हुषार बायको हळदीकुंकवालासुद्धा सासूची आज्ञा झाल्याखेरीज बाहेर जात नाहीं. बरोबरीच्या जावा व नणंदा एकमेकींच्या कलाप्रमाणे वागतात. | या अविभक्त कुटुंबपद्धतीनुळे घरांत एकतंत्रीपणा राहातो. बजबजपुरी माजत नाहीं. संघशक्तीचे सारे फायदे घराण्याला मिळतात. घराण्याची इभ्रत, दरारा, व वजन बाहेरच्या लोकांवर पडते, व सर्व स्त्रीपुरुषांस शांतिसौख्याचा उपभोग घ्यावयास सांपडता. घराण्यांत सर्व जीव एका प्रेमरज्जूने बद्ध असले, व अशा पुष्कळशी घराणी संधशक्ती