पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ प्रीति ही नेहमी निर्हेतुक असावी, म्हणजे कोणताही स्वार्थपर हेतु मनांत न धरता बंधुप्रेम ठेवावें, मनांत हेतु धरून बधुप्रेम करणे हा अगदी गौणपक्ष होय. आपण सर्व एकाच हाडामांसाचे आहों में मनांत वागवून बंधुबंधूंनी एकमेकांवर ममता करावी. एकमेकांशी स्नेहभावाने, न्यायाने व, समतेने वागावें. आपल्यापासून दुसन्यास दुःख किंवा भीति वाटणार नाहीं असे सर्वदा वर्तन ठेवावे, ईश्वरकृपेने जर तुम्हांस त्यांच्यापेक्षा अधिक विद्या प्राप्त झाली, किंवा संपात्त आधक मिळाली, तर तुम्ही त्यांची हेटाळणी करू नका. त्यांशी नेहमी मर्यादेने वागा. एकमेकांविषयी मत्सर व | हेवादावा मनांत केव्हाही बाळगू नका. एकमेकांची निंदा किंवा नुकसान करण्याचे मनांतसुद्धा येऊ देऊ नये. कोण आपलें थोडेबहुत नुकसान केले तरी ते मोठ्या मनाने सहन करावे. कारण बहीण भावंडे हीं एकमेकांच्या उपयोगी पडण्यासाठी जन्मलेली असतात. म्हणून एक| मेकांच्या ठिकाणी कांहीं उणेपणा दिसल्यास त्यांना उपदेश करून वाटेवर आणणे व त्यांना निभावून नेणें हैं। प्रत्येकाचे कर्तव्य होय. । | धाकट्या बंधूची ज्याप्रमाणे योग्यता अधिक अधिक वाढत | जाईल, त्या त्याप्रमाणे त्यांजवर अधिक अधिक जोखमीची व विश्वासाची कामें सोंपवत जावे, म्हणजे त्यांस त्यांचे महत्त्व वाटून त्यांचे मनांत वडील बंधूवषयी पूज्यबुद्ध उत्पन्न होते, दुस-यांदेखत धाकट्या बंधूस मान देणे व हलकी कामे त्यास करावयास न सांगणे हे फार चांगले. असे