१२ ठेवू नये. धाकट्या बंधूवर पुत्राप्रमाणे प्रेम करावें. व वडीलबंधूच्या ठिकाणी पित्याप्रमाणे पूज्यबुद्धि ठेवावी. बंधूवर नेहमी विश्वास ठेवावा. त्यांचा घातपात करण्याचे व त्यांश लबाडी करून त्यांना फसविण्याचे मनांतसुद्धा येऊ देऊ नये. एखाद्या मनुष्यास विश्वासू बनविण्याचा खात्रीलायख उपाय म्हटला म्हणजे त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकणे हा होय. । भावाभावांचे हितसंबंध बहुतेक समसमान असतात, म्हणून जी गोष्ट एकास अनिष्ट असते तीच दुसन्यास इष्ट कधीही व्हावयची नाहीं. म्हणून परस्परांनी एकमेकांच्या हितसंबंधास झटणे म्हणजे आपल्या स्वत:च्याच कल्याणाकरितां झटण्यासारखे आहे. म्हणून भावाभावांनी सलोख्याने वागून परस्परांच्या सहाय्याने कोणतीही गोष्ट तडीस नेणे यांतच उभयतांचे कल्याण असते. म्हणून आपण कोणत्याही स्थितीत असलो तरी एकमेकांच्या उपयोगी पडण्यास सर्वदा झटावें. जो विपत्तींत असेल ततून त्याला मुक्त करावें. जो मार्ग चुकून भलत्याच आडमार्गाने भटकत असेल त्याला चांगला मार्ग दाखवावा. असे एकमेकांच्या उपयोगी पडणे म्हणजे आपलें कल्याण करणेच होय. आपल्या बंधूंचा वडिलार्जित मिळकतींत जो योग्य हिस्सा असेल तो त्यांस देण्यास आपण नेहमी तयार असावें. आपल्या बंधूंनी आपले कितीही नुकसान केले असले तरी आपण आपल्या बंधुधर्मास जागून त्यांच्या संबंधाचे हरएक कर्तव्य मनापासून करीत असावें, बंधु
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/20
Appearance