पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ). बंधुभगिनीप्रेम — ६९ श्लोक मातेच्या उदरीं समग्र असती एकाच जे जन्मले। तैसे बाळपणांत एकवटुनि एके स्थळीं खळले ॥ वाढी मोदभरें सदैव जननी ते अन्न जे जेवले। त्यांनी ते विसरून वाद करितां कैसे दिसे चांगलें ॥१ एकाला दिधला जरी जननिने खाऊ कधी थोडका । सर्वांना दिधल्याविण तरि कुणी लावू नये त्या धका ।। ज्यांनीं बालपण असे जननिला स्वप्रेम हो दाविलें ॥ त्यांनी ते विसरून वाद करितां कैसे दिस चांगलें॥२॥ ( उपदेशमालाकार ). भावंडांनी परस्परांशी प्रेमाने वागण्यांत फार सुख व आनंद आहे, म्हणून त्यांनी एकमेकांवर प्रीति करावी. एकमेकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी आपलपोटेपणाने स्वतःच्याच सुखाची इच्छा करू नये. आपणाप्रमाणे दुस-या भावंडांनाही सुख झाले पाहिजे असे नेहमी मनांत वागवावे. परस्परांविषयीं खरे प्रेम असणे, एकमेकांच्या हिताविषयी कळकळ वाटणे, एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार होणे, संकटांत परस्परांस मदत करणे व प्रसंगी त्यांना योग्य सल्लामसलत देणे ही बंधुत्वाची लक्षणे हात, आईबापांचे सर्व मुलांवर सारखे प्रेम असते. त्यांना वाटते आपल्या सर्व लेकरांनी एकमेकांवर प्रीति करावी व