Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखी कोण ? - - प्राचीन काळीं ग्रीस देशांत साक्रेतीस या नांवाचा एक मोठा तत्ववेत्ता व साधु पुरुष होऊन गेला. एकदां, एका गृहस्थाने त्यास असा प्रश्न केला की, इराणचा बादशहा अर्चिलास हा आजकाल सर्वाकडून महा भाग्यवान् समजला जातो, त्याला तुम्ही सुखी समजत नाहीं काय ? साक्रेतिसाने उत्तर दिले, मला ठाऊक नाही. कारण मी त्याच्याशीं कधीं संभाषण केले नाहीं. गृहस्थ म्हणाला, तर मग इराणच्या बादशहास देखील तुम्ही सुखी मानीत नाहीं काय ? साक्रतिसाने उत्तर केले, जर मला तो किती सज्जन आहे, किंवा विद्वान् आहे हे माहीत नाहीं; तर मी त्यास सुखी कसे मानावे ? गृहस्थ म्हणाला, तर मग सुख या गुणांना प्राप्त होते असे तुमचे म्हणणे ? साक्रेतिस म्हणाला “ होय; सज्जन हे सुखी व दुर्जन दुःखी असे मी समजतों, ?' गृहस्थ म्हणाला “तर मग अर्चिलस दुःखी काय ??” “होय, जर तो सात्विक व शीलवान नसेल तर तो दुःखीच समजला पाहिजे, असे साक्रेतिसाने उत्तर केले.