Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० एकमेकांशी गोडीगुलाबीने वागावें; व त्यांना असे वाटणे साहजिक आहे. कारण तुम्ही सर्व भावंडे त्यांच्याच कृपाछत्राखालीं नेहमी जेवतां, बसतां, खेळतां, व मौज मारतां. तंटा बखेडा न करितां सर्व मुलें आनंदित असलीं म्हणजे आईबापांना फार सुख व समाधान वाटते, त्यांनीं । भावंडांना भांडतांना पाहिले म्हणजे त्यांना फार दुःख होते. म्हणून तुम्ही आपल्या भावंडांवर प्रीति करा. त्यांना त्रासवू नका व वाईटसाईट नांवे ठेवून हिणवू नका. त्यांना मारण्याकरितां आपला हात कधीही उगारूं नका. तीं दुखणांईत किंवा संकटांत पडली तर त्यांचे समाधान करण्यास तुम्ही रात्रंदिवस झटा, तुम्हांस हवी अशी वस्तु त्यांजपाशीं असेल तर ती त्यांच्यापासून हिसकावून व रागे भरून घेऊ नका. त्यांना आवडणारी बस्तु तुम्हांजवळ असल्यास ती त्यांना द्या. जेव्हा तुम्हांभावंडांत क्षुल्लक बाबतींत तंटे उत्पन्न होतात तेव्हां ते तटे तुम्ही आपआपसांत समजुतीने तोडीत जा. ते विनाकारण वडील माणसांपर्यंत नेऊन त्यांना त्रास देणे केव्हाही चांगले नाहीं. सर्व मुलांची बुद्धि व प्रकृति सारखी नसते. म्हणून ज्याच्या त्याच्या प्रकृतिमानाप्रमाणे वडील माणसे त्यांना शिक्षण देतात, व प्रसंगाविशेधी त्यांची राहण्याची जेवणाखाण्याची व कपड्यालयाची निराळी योजना करतात. एवढ्यावरून मुलांनी रागावून आईबापांविषयी गैरसमज होऊ देऊ नये, म्हणजे आईबाप अमक्यावर अधिक प्रेम करतात व आपल्यावर कमी प्रेम करतात असे मनांत येऊ