Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ती बंडी आंगांत अडकविली व खिशांत ती मेहर जपून ठेविली. नंतर धोतर उचलून वर घेतले. तों त्यांतून दुसरी मोहर खाली पडली. ती पाहून तर तो आश्चर्याने अगदी थक्कच होऊन गेला. त्यास मोठा गहिंवर आला. त्याने गुडघे टेकले व आकाशाकडे दृष्टि लावून परमेश्वराची मोठ्या प्रेमानें प्रार्थना केली. तो म्हणाला “ देवा, तू किती दयाळू आहेस ! माझी बायको आणि मुले आजारी असून ती उपासाने मरत आहेत, असे पाहून तूच ही देणगी कोणा कृपाळू, दयाशील महात्म्याच्या हातून मला न कळत मजकडे पाठविलीस, असे मी समजतों. तुझ्या या योग्य वेळी दिलेल्या देणगीने माझी | बायकामुलें दुखण्यांतून व उपासमारींतून आतां खास. | वांचतील, यांत संशय नाहीं. - हे पाहून गोविंदाचा कंठ अगदी दाटून आला. त्याचे | डोळे प्रेमाश्रूने अगदी भरून गेले. तेव्हां गुरुजी त्यास | म्हणाले 4 काय गोविंदा, त्या गरीब मनुष्याची वस्त्रे दडवून ठेऊन तुला जी मौज वाटली असती, त्यापेक्षा हल्लींचा आनंद जास्त नाहीं काय ? यावर गोविंदानें उत्तर दिले, ** गुरुजी, आपण आज मला हा नीतीचा उत्तम पाठ दिला. हा मी केव्हाही विसरणार नाहीं. * घेण्यापेक्षा देण्यांत जास्त सौख्य आहे' असे आपण नेहमीं आम्हांस शिकवितां, पण त्या शब्दांचे रहस्य अजच मला बरोबर समजले.