पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाण्याचे बेतांत होता. त्याचीच ती वस्त्रे असावीत असे त्यांना वाटले, | तेव्हां तो विद्यार्थी गुरुजींकडे वळून म्हणाला “गुरुजी, आपण या म्हाताच्या मनुष्याची थोडीशी मौज करूं या का ? याची हीं वस्त्र दडवून ठेवून, ती न सांपडल्यामुळे याची कुशी तारंबळ उडते ती पाहणेसाठी आपण या आम्रवृक्षाच्या आड दडून बसू." यावर गुरुजी म्हणाले, बाळा , गरिबांची अशा प्रकारे कुचेष्टा करून आपली करमणूक कधीही करून घेऊ नये. तू श्रीमान् आहेस. तेव्हां या गरीब मनुष्याशीं अन्य तहेने वागून तुला आपले मन रमविता येईल. या मनुष्याच्या धोतरांत एक, व बंडात एक अशा दोन मोहरा घालून ठेव, व नंतर आपण या आम्रवृक्षाच्या आड दडून बसू, व त्या वृद्ध मनुष्यास काय वाटते ते पाहू. गोविंदाने त्याप्रमाणे केले, व ते दोघेही जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या आड पुढे काय होते ते पाहण्यासाठी दडले, इतक्यांत तो गरीब मनुष्य आपले काम संपवून ते शेत ओलांडून आपल्या पांघरुणांपाशी आला. अंगांत घालण्याकरिता त्याने बंडी वर उचलली. तो त्यांतून एक मोहर पटकन् खाली पडली. काय पडले ते पाहण्यासाठी तो चटकन् खाली वांकला. तो त्यास ती मोहर दिसली. ती पाहून तो अगदी आश्चर्यचकित झाला. त्याने ती न्याहाळून पाहिली. पुनः पुनः तिला खालींवर करून तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. नंतर त्याने आसपास पाहिले, पण कोणीही त्यास दिसलें नाहीं. नंतर त्याने