पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्याच्या अंगीं सद्गुण असतात व ज्याच्या हातून सदाचार घडतो, तोच जिवंत आहे म्हणावयाचा.- सण आणि सदाचार हीं ज्याच्या ठायीं नाहीत, त्याचे जीवित निष्फळ होय. सुभाषित भाग्याला सुजनत्व भूषण असे, की मौन शौर्यास ते ।। ज्ञानाला शम, त्या श्रुतास विनय, द्रव्यास दातृत्व तें ॥ अक्रोधत्व तपा, क्षमा प्रभुपणा, धर्मास निंर्दभता ।। या सवसहि मुख्य भूषण पहा सच्छील हे तत्वतां ।। १ वामन पंडित उत्तम पाठ -:०:- सातार प्रांती, कृष्णा नदीच्या किना-यास एक गांव आहे. तेथे एका विद्वानापाशी कांहीं विद्यार्थी विद्याभ्यास करीत असत. एक दिवस सुटी होती, त्या दिवशीं, गोविंदा नांवाचा एक विद्यार्थी गुरुजीबरोबर सहल करावयास निघाला. ते गुरुजी मोठे प्रेमळ असून विद्यार्थ्यांशी फार ममतेने व सलगीने वागत. यावरून सर्व लोक त्यांस विद्यार्थ्याचा मित्र असे म्हणत. जाता जातां त्यांना एक खादीचे जाडेभरडे फाटकें धोतर व तसलीच एक बंडी वाटेवर पडलेली दिसली. जवळच एका शेतांत एक गरीब मजूर, आपलें त्या दिवसाचे काम संपवून घराकडे