पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाडे व वेली माजतात व आपल्या पसरण्याने व जोमानें चांगल्या झाडांची वाढ खुटवितात; त्याचप्रमाणे नीच वृत्ति उच्च वृत्तींना दडपून टाकतात. मनोवृत्तींची शक्ति अचाट आहे. या मनोवृत्तींची योग्य जोपासना करून शीलसंवर्धनाकडे उपयोग करून घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. कारण सर्व साहित्य असून एक मीठ नसेल तर सर्व अन्न बंचव लागते. त्याप्रमाणे अंग बुद्धिमत्ता, विद्वत्ता व संपत्ति वगैरे सर्व गोष्टींची अनुकूलता असून जर शील चांगले नसेल तर सर्व गुण निरुपयोगी होतात. नानाविध चमत्कारांनी पूर्ण असणा-या सृष्टीचा उपयोग जसा आंधळ्या मनुष्यास करून घेता येत नाहीं, तसा शीलहीन मनुष्यास त्याच्या अंगच्या गुणांचा उपयोग व्हावा तसा होत नाहीं. श्रीमान् होण्याचा प्रयत्न चांगल्या रीतीने होत असेल तर मनुष्यानें अवश्य करावा. तरी सर्वासच तो साध्य होईल अशी त्याच्याविषयी खात्री नसते. परंतु, तेच प्रत्येक मनुष्याने असे जर म्हटले की, माझे शील मी उत्तम प्रकारचे ठेवीन, अर्थात् माझे आचरण मी निष्कलंक ठेवीन, तर हे बरीक त्यास खचित साध्य होणार आहे. जी थोडीबहुल आपल्यास ईश्वराने बुद्धि दिली आहे तिचा चांगल्या कामाकडेच उपयोग करूं म्हटल्यास खचित करतां यणारे आहे. तसेच सत्य, नीति व प्रामाणिकपणा ह्यांचे लहानसान गोष्टीत देखील सदैव अवलंबन शक्य आहे. करितां ते सर्वांनीं अवश्य करावे,