पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६ ) समुद्रांत शिंपांमध्ये पडले तर तेच मोतीं बनते. यावरून असे दिसते की, उत्तम, मध्यम, कनिष्ट हे गुण संगतीच्या योगाने उप्तन्न होतात. ( ११ ). लवून उंच होतात, दुस-यांच्या गुणांचे वर्णन करून आपले गुण प्रासद्ध करितात, दुस-यांसाठी अनेक प्रकारचे यत्न करून स्वार्थ साधितात,न बोलतां सहन करून निंदायुक्त कठोर भाषण करणाच्या दुष्टांस दोष लावितात, अशा साधूचे आचरण आश्चर्यकारक होय. हे जगांत कोणास पूज्य नाहींत ? | ( १२ ). फळे आली म्हणजे वृक्ष लवतात, पाण्याच्या योगाने ढग लोंबू लागतात, सत्पुरुष समृद्धीने नम्र होतात, तस्मात् परोपकारी जे आहेत, त्यांचा नम्रपणा है। स्वभावच आहे. ( १३ ), कान, शास्त्रश्रवण केल्यानेच शोभता. भिक बाळीनें शोभत नाहीं. दानाने हात शोभतो, कड्या शोभत नाहीं. कृपाळू मनुष्याचें शरीर परोपकाराच्या योगाने शोभते, उटीने शोभत नाहीं. | ( १४ ) लोभ सोडून दे, क्षमा धारण कर, उन्मत्तपणा टाक, पापवासना धरूं नको, खरे बोल, साधूच्या मार्गाचे अनुकरण कर, विद्वानांची सेवा कर, मान देण्यास योग्य असतील त्यांस मान दे, शत्रुवर कृपा कर, आपल्या अंगचे गुण वणू नको, कीर्तीचे रक्षण कर, दुःखितावर दया कर, हे सर्व सज्जनांचे आचरण आहे.' ( १५). ज्यांची मने, वाणी, शरीर हीं पुण्यरूप अमृताने भरलीं आहेत, जगावर शेंकडों उपकार करणार,