पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११७ ) दुसन्याचा लेशमात्र गुण पर्वतासारखा करून अंतःकरणांत आनंद पावणारे असे कित्येक सज्जन आहेत. ( १६ ). कधीं भूमीवर निजतो, कधीं पलंगावरही पडतो, कधी घोंगडी पांघरतो, कधीं उंची वस्त्रे वापरतो, कधी भाजी खाऊन राहतो, कधी शाल्योदन भक्षण करितो कार्यसिद्धीविषयी उत्सुक असा शहाणा मनुष्य सुख किंवा दुःख यांस मोजीत नाहीं. | ( १७ ). ऐश्वर्याचे भूषण सौजन्य, शौर्याचे भूषण । वाक्संयम, ज्ञानाचे भूषण शांति, विद्येचे भूषण विनय, द्रव्याचे भूषण सत्पात्र व्यय, तपाचे भूषण अक्रोध, समथचे भूषण क्षमा, धर्माचे भूषण निष्कपटपणा, सर्वांचे कारण सुस्वभाव आहे. सुस्वभाव हाच उत्तम अलंकार होय. ही गोष्ट सर्वीस लागू आहे. (१८), कोणी निंदा करोत. किंवा स्तुति करोत.लक्ष्मी येवो किंवा जावो, मरण आज येवो किंवा दुस-या युग येवो,न्याय मार्गापासून शहाणे लोक पाऊल हालवीत नाहींत. ( १९ ). झाड तोडलें तरी पुनः फुटते, चंद्र क्षीण झाला तरी पुनः वाढतो, असा विचार करून सज्जन लोक विपात आली तरी दुःखी होत नाहींत. । ( २० ). अप्रिय भाषणाविषयीं दरिद्री, प्रियवचनाविषयी संपन्न, परानंदेपासून निवृत्त अशा पुरुषांच्या योगाने पृथ्वी कोठे कोठे भूषित आहे. | ( २१ ), मशाल खाली केली तरी अग्निज्वाळा वर यावयाच्याच, त्याप्रमाणेच धैर्यवानास कितीही विपत्ति आल्या तरी, त्याचे धैर्य नाहींसें व्हावयाचें नाहीं.