पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११५ ) च होत जाणारी अशी दुष्टांची मैत्री असते. सज्जनांची मैत्री संध्याकाळच्या सावलीप्रमाणे पहिल्याने कमी, व मग वाढत जाणारी अशी असते. ( ६ ). सत्संगाची इच्छा, दुस-यांच्या गुणांवर प्रीति, गुरुजनांविषयीं नम्रता, विद्येचे व्यसन, लोकापवादाचे भय, ईश्वरावर भाक्त, मनाचा निग्रह करण्याविषयी शाक्त, कुसंगतीचा त्याग, हे निर्मळ गुण ज्यांचे ठायीं वास करतात, त्या पुरुषांस नमस्कार असो. ( ७ ). विपत्तींत धैर्य, भरभराटीच्या वेळेस क्षमा, सभेमध्ये वाक्पटुत्व, युद्धांत पराक्रम, कीर्तीची आवड, विद्येचे व्यसन, ही मोठ्यांच्या अंगीं स्वभावसिद्ध असतात. | ( ८ ). गुप्तपणे दान करणे, कोणी घरीं आला असता आदरसत्कार करणे, दुस-याचे बरे केले तरी त्याची वाच्यता न करणे, आपल्यावर कोणी उपकार केला तर तो मात्र चौघांत सांगणे, लक्ष्मी असतांही गर्व नसणे, दुस-याची वाईट गोष्ट न बोलणे, हे तरवारीच्या धारेसारखें तीव्र व्रत साधूस कोणी सांगितले. ? | ( ९ ). हस्ताच्या ठायीं दातृत्व, शिराच्या ठायीं थोरांविषयी नम्रता, मुखामध्ये सत्य भाषण, बाहूंमध्ये मोठा पराक्रम, अंत:करणांत स्वस्थता, कर्णानी शास्त्रश्रवण, हीं, संपत्तीशिवाय स्वभावतःच जे मोठे आहेत, त्यांची भूषणे होत. | ( १० ). तापलेल्या लोखंडावर पाणी पडलं तर त्याचा मागमूस देखील राहात नाहीं. तेच कमलपत्रावर पडले तर मोत्यासारखें शोभते. स्वाती नक्षत्राच्या वेळेस