पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११४ ) हरी हा राजा असून मोठा विद्वान् व कवि होता. त्याने पु-कळ काव्यग्रंथ लिहिले होते. पण ते बहुतेक नाहींतसे झले आहेत. श्रृंगार, नीति अणि वैराग्य या नांवांचीं यानं केलेली तीन शतके फार प्रसिद्ध आहेत. त्याचे ६ नीतिशतका " पैकीं कांहीं उतारे पुढे दिले आहेत. यांवरून पुष्कळ नीतिबोध घेण्यासारखा आहे. । ( १ ), बाहुभूषणे, चंद्रासारखे प्रकाशित हार, स्नान, चंदन, पुष्पें, चांगले केश हे पुरुषांचे खरे अलंकार नव्हेत; संस्कारयुक्त अशी वाणी जवळ असली, तर ती एकटीच पुल्पास शोभा आणिते, इतर भूपणे नेहमी झिजतात, वाणी । हैं मात्र खरे भूषण होय, | ( २ ) विद्या हेच मनुष्याचे उत्तम सौंदर्य होय. विद्या हेच सुरक्षित धन, विद्या उपभोग देणारी, कीर्ति कणारी, सुख करणारी, विद्या गुरूंचा गुरु, परदेशी जाण्यास विद्या हाच मित्र होय. विद्या मोठी देवता होय, विद्य चा मान राजांमध्ये सुद्धा होतो, धनाचा होत नाहीं. विद्यहीन मनुष्य केवळ पशु होय. ( ३ ). विघ्ने येतील म्हणून हलके लोक काम आरंभं तच नाहींत, मध्यम असतात ते विघ्ने आली म्हणजे सोडून देतात, उत्तम असतात ते विघ्ने पुनः पुनः आली तरी आरंभिलले काय सोडत नाहींत. ( ४ ), दान, उपभोग, नाश ह्या धनाच्या तीन अवस्था आहेत. जो देत नाहीं, व उपभोगही घेत नाहीं, त्याच्या धनाची तिसरी अवस्था होते. ( ५ ). सकाळच्या सावलीप्रमाणे मोठी, व मग कमी