पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११३ ) (१०) आपली सद्सद्विवेकबुद्धि आपणास सांगेल त्याप्रमाणे तू वागलास म्हणजे तुला कशाची ही काळजी नको. ( ११ ) जोपर्यंत जगांत कांहीं शिकण्याजोग म्हणून शिल्लक आहे तोपर्यंत तू आपला शिकत जा. कधीं आळस करू नकोस, पैशापेक्षा चांगल्या उपदेशाची किंमत फार अधीक आहे. हे ध्यानात घर. (१२) आपल्या शेताप्रमाणेच आपल्या मनाचीही मशागत केली पाहिजे. कारण मनाची शुद्धता जसजशी • वाढत जाते तसतसा आपणास दैविकपणा येत जातो. ती जसजशी कमी होते तसतसे पशुत्व अंग जडत जाते. | ( १३ ) दुर्गुणी नसणे हा सणच आहे. ( १४ ) हेतु चांगला धरावा. चांगल्या उपदेशाचा आदराने स्वीकार करावा. (१५) वाईट स्थिति आली म्हणून खेद करू नये, चांगली स्थिति आली म्हणून गर्व वाहूं नये, कारण बदल हा सर्व गोष्टींत ( रहाटगाडग्याप्रमाणे ) होतच असतो. भर्तृहरी. »:०:* प्राचीन काळी आपल्या या भरतखंडांत जी पुरुषरत्ने होऊन गेली त्यांपैकीच भर्तृहरी में एक होय. भर्त