पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११२ ) मनुष्याला समजलीं नाहींत. तरी सर्वज्ञ जो परमेश्वर त्याला ती दिसतातच दिसतात. ( ३ ) राजे, राजपुत्र व अधिकारी लोक यांजविषयी फार आदर बाळगावा. कारण ते अपराध्यांस दंड करतात, व निरपराध्यांचे त्यांजपासून संरक्षण करतात. | ( ४ ) आपल्या मुलांनी आपल्याला जो भान द्यावा असे तुला वाटते तोच मान तू आपल्या आईबापांना देत जा, | ( ५ ) चांगल्या संगतींत आनंद मानावा. कारण त्या संगतीचे अनुकरण केल्यास कल्याणच होते. ( ६ ) रोज सकाळी उठून आपल्या कामाला लागाव. चांगल्या गोष्टी तेवढ्या शिकाव्या. लोकांवर उपकार करावे. या तीन गोष्टी केल्या असतां आपणास पश्चात्ताप कधीही शिवत नाहीं. | ( ७ ) चैनीपणा, आधाशीपणा, त्याचप्रमाणे दारू बाजपणा या गोष्टींचा आपणास स्पर्श देखील होऊ देऊ नकोस. कारण दारूपासून फार अनर्थ होतात. (८) आपण आपले काम करावे. दुसन्याच्या कामात विनाकारण पडू नये. कोणाची निंदा करूं नये, आणि दुसन्यांनी कोणाची निंदा केली तर ती ऐकू नये. कारण निंदा ऐकण्याची सवय ज्यास लागली त्यास तोंडाने निदा करण्याची सवय लागणारच. । (९) ज्याचे म्हणून आपल्या हातून बरे होईल त्याचे बरे करीत असावें. ज्याचे बरे करणे आपल्याला शक्य नसेल त्याचे काही वाईट तरी करू नये.