पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


प्रामाणिकपणा, सत्य व न्याय ही जर वाढतील तर जगांतील दुःख नाहींसे होऊन सुखाची समृद्धि होईल. मनुष्यजातीचे सुख वाढण्यास मनुष्याधीन गोष्टींमध्ये शीलाइतकी अवश्यक गोष्ट दुसरी कोणतीही नाहीं. : | आपले आयुष्य चांगल्या किंवा वाईट रीतीने जाणे हे बहुतेक अंशी आपल्यावरच अवलंबून आहे. आपण जर सद्वर्तनाने वागलों तर आपले आयुष्य खात्रीनें सुखांत जाईल, व आपण अनीतीने वागलों तर ते दुःखांत जाईल, आपल्या सद्वर्तनाने आपण आपलेच जीवित्व सुखी करतों असे नाही, तर दुसन्याचे जीवित्वही सुखी करण्यास आपण मदत करीत असतो. आनंदी माणसाच्या सहवासांत असलेली सर्वच मनुष्यें आनंदी व उत्साही असतात. कारण मनुष्यप्राणी हा अनुकरणप्रिय आहे. व तो आपल्या शेजा-यापाजा-यांचे व स्नेहींसोबती यांचे अनुकरण करीत असतो. मुलांच्या अंगीं तर हा गुण विशेष असतो. जसे आपण असू तसेच दुसरे आपल्या सहवासांतील असतील, म्हणजे आपल्या स्वभावाचे प्रतिबिंब आपल्या सहवासांतील दुस-या मनुष्यांत पहावयास सांपडेल. | मनुष्याच्या अंतःकरणांत कांहीं उच्च कांहीं नाच व कांहीं या दोन्ही विशेषणांस अपात्र अशा मनोवृत्ति उत्पन्न होत असतात. त्यांत उच्च मनोवृत्तीचा परिपोष व नीच मनोवृत्तीचे निर्दालन हीं योग्य प्रसंगी झाली नाहींत तर, चांगली व वाईट झाडे अव्यवस्थितपणे वाढलेल्या बागेची स्थिति मनाला प्राप्त होते. अशा बागेत बहुधा वाईट