( १०५) म्हणून त्यांच्याकरितां एक विश्रांतिगृह काढलेले आहे. त्याचे बहुतेक श्रेय महाराणी साहेबांसच आहे. | या महाराणी साहेब सहल करीत असतां वाटेंत त्यांना कोणी दीन दुबळे भेटले असता त्यांची त्या कळकळीनें विचारपूस करितात, व त्यांच्याशी त्या मायाळूपणाने बोलतात, त्या आपल्या नेमणुकींतून गोरगरिबांस देण्याकरित मोठी रक्कम काढून ठेवितात, व तिचा विनियोग गरि|बांचे दुःख निवारण्याकडे लावितात. कित्येक वेळा त्या बाजारांतून फुले विकत आणितात व त्यांचे गुच्छ वगैरे बांधून दवाखान्यांतील रोग्यांस मोठ्या प्रेमाने नेऊन देतात. गरीब लोकांची स्थिति सुधारण्याकरितां काय केले पाहिजे हे जाणण्याकरितां त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला | आहे, दीन दुबळ्यांना आणि अनाथांना मदत केल्यापा सून होणारा सात्विक आनंद हाच सर्वात श्रेष्ठ आनंद | आहे असे त्यांचे मत आहे. आपल्या मुलांनाही आपल्या| सारखें धार्मिक व्हावे व त्यांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून साम्राज्ञी ह्या फार काळजी घेतात. त्यांनी आपल्या मुलांच्या मनावर भूतदयेचा चांगला ठसा उमटवला आहे, हैं पुढे दिलेल्या एकाच गोष्टीवरून दिसून येईल. राजकुमाराची परोपकारबुद्धि. -}}}} - महाराणी मेरी साहेबांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स एडवर्ड हे एकदां रडू लागले. त्यांची समजूत करण्यासाठी त्यांची
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/113
Appearance