पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०३ ) तिने निश्चय केल्यासारखा दिसला । जहाज खडकावर आपटले त्या वेळेपासून तो अखेरपर्यंत त यत्किंचितही डगमगाली नाही, त्या भयंकर प्रलयांत ती डेकवर आली, ती प्रत्येक उतारूजवळ गेली. मायेच्या गोड शब्दांनीं तिने प्रत्येकाचे सांत्वन केले, आणि एखादी आई जशी आपल्या लहान मुलास चालण्यास मदत करते, त्याप्रमाणे जहाजावरून खाली उतरण्यास तिने सर्वांस सहाय्य केले. कोणाचीही तिने हेळसांड केली नाहीं. सर्वशीं मायेने बोलून त्यांना धीर देत सर्व होड्या भरे| पर्यंत ती सारखी डेकवर गरगर फिरत होता. जीव वांचविण्याचे रबरीपट्टे बहुतेक सर्व बायांच्या अंगावर तिनेच बांधले व त्या सर्वाना तिर्ने होड्यांत उतरविलें, बहुतेक सर्व बाया उतरविल्यावर ती मागे वळून पाहाते तो एक बाई बिन पट्याची राहिली व दुसरा पट्टा तर शिल्लक नव्हता तेव्हा तिने आपल्या कमरेचा स्वतःचा जीव बचाविण्याचा पट्टा काढला व त्या बाईच्या कमरेला बांधून तिला जलदीने होडीकडे घेऊन गेली. त्या बाईला होडीत बसविले, त्या वेळीं खलाशी ओरडून म्हणाले:-* राजर्सबाई, तुम्ही हाडींत उडी टाका. छे छे । होर्डी गच्च भरली आहे.. मी आत आले तर कदाचित् होडी बुडेल, तुम्ही लवकर होडी वल्हवा !असे म्हणून तिने सवाँख शेवटचा राम राम केला. नंतर ती आपले हात वर करून म्हणाली-- देवा, मला पदरांत घे.' नंतर लवकरच ती स्टेला आगबोट समुद्रात बुडाली, त्याबरोबर परोपकारी मिसेस रॉजर्स बाईही आपली धवल कीर्ति मागे ठेवून बुडाली.