पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलंकारांनी रहित होत्या. परंतु त्यांचा शील हा अलंकार नेहमी त्यांच्यापाशी असल्यामुळे किंवा तो इतर अलंकारांप्रमाणे शत्रूना जिंकून घेता येण्याजोगा नसल्यामुळे ते त्या अलंकाराने रहित असे कधीच झाले नाहींत. व त्यामुळेच त्यांचे नांव अजरामर झाले आहे. नाहीतर जगाच्या आरंभापासून आजपर्यंत, पायाच्या नखापासून डोक्याच्या केंसाच्या अग्रापर्यंत दागिन्यांनीं व उंची वस्त्रांनी नटणारे असंख्य पुरुष व स्त्रिया मरून गेल्या असतील, परंतु त्यांची नांवेंही आम्हांला माहीत नाहींत. तेव्हां अलंकारापेक्षां शील या अलौकिक अलंकाराचे महत्त्व किती आहे याचा विचार प्रत्येकाने करावा. शरीराला भोंके पाडून त्यांत घालावयाचे व शरीराला भारभूत होऊन दुसयाच नेत्रांना सुंदर भासणारे अलंकार संपादन करण्यापूर्वी विचारी स्त्री, पुरुष व मुले यांनी मनाला व शरीराला भारभूत म्हणजे जड न हीणारा, व आपल्या मनाला आल्हादरूपाने पदोपदीं फलद्रूप होणारा शील हा अलंकार अगोदर संपादन करावा. | कारण सर्व सृष्टीचे सुखास शील ही अवश्यक गोष्ट आहे. जगांतील सुख वाढविण्यास व दु:ख कमी करण्यास अत्यंत उपयोगी अशी मनुष्याच्या हातची गोष्ट शीलाशिवाय दुसरी कोणतीही नाही. कारण मानवी कृतीमले जे दःख होते, ते मुख्यतः स्वार्थीपणाच्या व अ कृतींनी होते. मानवी दु:खाच्या कारणाबद्दल जर थोडा विचार केला तर आपणास असे आढळन ये मनुष्याचे दुःशाल हेच सदर दुःखाचे कारण आहे -