पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९९) कुस्तीत पाय अगर हात मोडला म्हणजे तो अगदी परावलंबी होते. त्याला क्षुल्लक कारणाकरितां सुद्धा दुस-याची मदत घ्यावी लागते, अशी काही उदाहरणे आपल्या दृष्टीस पडतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या सुस्थितीत दुसन्या गरजू लोकांना आपल्याकडून होईल तितकी मदत करावी, ज्याच्यावर संकट आले असेल त्याचे संकट दूर करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, अशः योगानें संकटांत पडलेला मनुष्य संकटांतून लवकर मुक्त होतो. व त्यास मोठे समाधान वाटते, व त्याच्या दसपट समाधान ज्यांनी त्यास सहाय्य केले असेल त्यांस वाटते. कारण सहाय्य करणाराला असे वाटते की, ** परमेश्वराने आपणास दिलेल्या सामथ्र्याचा आज योग्य उपयोग झाला मग ते द्रव्यबल असो, अगर शारीरिक बल असो अगर दुसरे कोणतेही सामध्ये असो. एखादा पोहतां न येणारा मनुष्य पाण्यात बुडून मरत आहे असे एखाद्या उत्तम पोहतां येणा-या मनुष्याने पाहिलें । त्या पोहणाच्या मनुष्याने आपल्या जिवाकडे न पाहतां जर उडी घालून त्या बुडणान्या मनुष्यास वर काढले तर त्या दोघांनाही आनंद होईल, यात शंका नाही. परंतु ज्या मनुष्याने जिवाची पर्वा न करतां पाण्यात उडी घालून बुडणाच्या मनुष्याला वर काढले, त्याला तर अत्यंत आनंद होऊन एक प्रकारचे सात्विक समाधान नेहमी वाटेल, व ते समाधान अवर्णनीय आहे. | परोपकार करण्याला पैसा हे एकच साधन आहे असे नाहीं. परोपकार करण्याची अनेक साधने आहेत. व प्रत्येक मनुष्याला आपआपल्या परीने दुस-याच्या उपयोग