पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९८ ) 4 ,

24 2 || 2 असतात तर कोणी दारिद्री असतात, अशा परस्पर विरोधी स्थितीत देवाने मनुष्य प्राण्याला उत्पन्न केलेले दिसते. याची दुसरी पुष्कळ जरी कारणे असली, तरी एकाने दुसयावर उपकार करावा, अगर परोपकारी माणसास आपलं औदार्य दाखविण्यास संधि असावी ह्मणूनच परमेश्वराने एकमेकींस विरूद्ध अशा दोन स्थिति उत्पन्न केल्या असा व्यात असे वाटते. या परमेश्वरी इच्छेनुरूप प्रत्येक व्यक्तीन दुस-याच्या सुखदुःखाचा विचार करावा हे योग्य होय. ज सशक्त असतील त्यांनी अशक्तास मदत करावा; विद्वान् असतील त्यांनी दुसन्यास आपल्याप्रमाणे विद्वान् करण्याचा प्रयत्न करावा; जे हुशार असतील त्यांनी २५ मतीस अभ्यासाच्या वगैरे काम साह्य करावे; व श्रीमंत असतील त्यांनीं गरिबांचा समाचार घेऊन त्यास योग्य ती मदत करावी, हे उचित होय. शिवाय मनुष्यावर नानातहेची संकटे येण्याचा संभव असता. जे आज सुस्थितीत आहेत, ते नेहमीच सुस्थितीत राहातील याची खातरी नसते. कोणत्या वेळी काय होऊन कोणावर काय संकट येईल याचा नियम नसतो. उदाहरणार्थ, जो आज चांगला धनोत्पादक धंदा करून ऐटीने संसार चालवीत असतो, तोच जर उद्यां आकस्मिक कारणाने आजारी पडला, व त्याचा धंदा चालविण्यास त्याच्यासारखा दुसरा कोणी माणस नसला तर त्याचा धंदा सपशेल बुडतो, व तो पैशाच्या अडचणीत येऊन त्याची अन्नान्न दशा होते. जो पैलवान आज आपल्या शक्तीची घमेंड मारीत असता, त्याच पैलवानाचा दुर्दैवेंकरून L