पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९७ ) (१२) परोपकार. परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम् ।। भावार्थः–दुसन्यावर उपकार करणे हेच पुण्य व दुस-याला पीडा देणे हेच पाप होय. | सद्भुणी लोक आपल्यांकडून होईल तितका दुस-यावर उपकार करतात. ते स्वप्नांतसुद्धां दुस-याला त्रास देत नाहींत. जो उत्तम पुरुष आहे तो तर आपल्या शत्रूवरसुद्धां उपकार करतो. तो दुस-याने दिलेली पड़िा मनातसुद्धा आणीत नाही. दुस-यावर उपकार केला म्हणजे जो आनंद होतो तो तर अवर्णनीय आहे. त्या समाधानासारखें समाधान तर दुस-या कोणत्याही कृत्याने होत नाही. चैन आणि विलास यांत द्रव्य उधळल्याने मनाला बिलकूल आराम पडावयाचा नाही. पण त्याच्या दशांश,नव्हे शतांश जरी द्रव्य परोपकाराच्या कामी खर्च केले तरी त्यापासून । अंतःकरणाला उत्तम प्रकारचे समाधान वाटते. : मनुष्यांनी एकमेकांवर उपकार करावा अशी परमेश्वराची य जना दिसते. कारण तशी जर त्याची इच्छा नसती तर सर्व प्राणी, निदान सर्व मनुष्यं तरी, सारख्याच स्थितीत त्याने उत्पन्न केली असती. परंतु तसे देवाने केलेले दिसत नाहीं. कोणी शरीराने सशक्त असतात, तर कोणी अशक्त असतात; कोणी मनाचे सदृढ असतात तर कोणी दुर्बल असतात; कोणी विद्वान् असतात, तर कोणी मूर्ख असतात; कोणी हुशार असतात, तर कोणी द असतात; काणी श्रीमंत