पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९६ ) गास्टचा प्रवाशास उपदेश. | ** | **गास्टन नामक विद्वानाने अज्ञात प्रदेश पाहाण्यास जाणाच्या प्रवाशांस पुढील प्रमाणे उपदेश केला आहेः • आपल्या प्रवासाची रीति कशी चालली आहे याकडे विशेष लक्ष द्यावे. आपला प्रवास केव्हां संपेल अशी रुखरुख मनास लावून घेऊ नये. जेव्हां रानटी प्रदेशांतून सुधारलेल्या देशाजवळ आपण येऊ तेव्हां ही कटकट एकदांची संपेल व संकटांतून कसे तरी पार पडू असे मनास वाटू देऊ नये; तर साहसाच्या प्रसंगांनी मनोहर झालेली ही वेळ निघून जाणार म्हणून मनास खेद वाटला पाहिजे. अशा त-हेने हळू हळू मार्गक्रमण करावे म्हणजे फारशीं संकटे येणार नाहींत व वाटेने स्नेही सोबती मिळतील, व त्या प्रदेशाची चांगली माहिती होईल. कोणत्याही प्रदेशाची चांगली माहिती झाली म्हणजे त्या प्रदेशांतील संकटांतून आपणांस निसटून जाता येते. अशा रीतीने कांहीं महिने प्रवार केल्यावर मागे वळून पाहावे म्हणजे आपण केवढ्या लांबीच प्रवास केला म्हणून आपणांसच आश्चर्य वाटेल. दररोः। आपण तीन भैल गेलो तरी एका वर्षांत एक हजार मैले विस्ताराचा मुलूख पाहून होईल. ही गोष्ट कांहीं लहानसहान नव्हे. मला वाटते की इसानीतीतील ससा आणि कासव ह्यांची गोष्ट विस्तीर्ण व अज्ञात प्रदेशांतून जाणान्या प्रवाशांस अनुलक्षूनच रचलेली असावी.'