Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९५) यांसारख्या इमारती, अजिंठा व वेरूळ वगैरे ठिकाणच्या लेण्यांसारखी कोरीव कामे व दक्षिण हिंदुस्थानांतल्या देवालयांची आश्चर्य करण्याजोगी शिखरें हीही पाहिल्यावांचून राहू नये. सारांश, यात्रा,जत्रा वगैरे कोणत्या तरी निमित्ताने प्रत्येकाने केव्हांना केव्हा तरी असली स्थाने पाहावीत हे उत्तम होय. | कारण अशा प्रवासास बाहेर पडले म्हणजे मनुष्यावर कित्येक बरे वाईट प्रसंग आपोआप येऊन त्यास त्यांपासून कांहीं तरी सोध घेण्यास सांपडतो. प्रवासांत येणा-या । निरनिराळ्या प्रसंगाच्या प्रत्यक्ष अनुभवाने पुस्तकांतील शहाणपणाचे धडे पडताळून पाहाण्याचा सुयोग त्यांस येतो; व अशा मिळालेल्या अनुभवसिद्ध ज्ञानाचा परिणाम अर्थातच चिरकाल टिकणारा असतो. व त्याचप्रमाणे भिन्नरुचीच्या अनेक माणसांशी प्रवासांत प्रसंग येतो, व त्यामुळे नुसत्या कल्पनेने ठराविलेल्या जगाच्या बाह्य रूपापेक्षां अंतरंग किती निराळेच चित्रविचित्र असते याचा मजेदार मासला पाहावयास सांपडतो. यामुळे व्यवहारांत संबंध येणाच्या कोणत्याही माणसाची तेव्हांच पारख करतां येते, व त्यामुळे लफंग्यांचे फसवणुकीचे डांवपेंच तेव्हांच ताडतां येऊन त्यांच्या जाळ्यांतून निसटतां येते. करितां । प्रत्येकानें शक्य तितका प्रवास करून आपल्या ज्ञानांत भर घालणे हे अत्यंत उचित आहे.