( ९४ ) सध्या रेल्वे, आगबोटी, तारायंत्रे व विमाने यांच्या योगाने प्रवास अत्यंत सुखकारक झाला आहे. देशाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत निर्भयपणे खुशाल संचार करावा. आगबोटीच्या योगाने सातासमुद्रापलीकडील देश खुशाल पाहावेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जपान यांसारख्या सुधारलेल्या देशांतील मोठमोठी शहरे, व्यापाराच्या पेठा, विश्वविद्यालये व लोकांच्या चालीरीति पाहाव्यात. त्या देशांतील मोठमोठे कारखाने व भव्य इमारती पाहून सुधारणेच्या प्रचंड स्वरूपाचे अवलोकन करावें, काश्मीर, मेक्सिको, ब्राझील या देशांतील सृष्टिसौंदर्य व नानाप्रकारचे निसर्गाने उत्पन्न केलेली सरोवरें, पर्वत, अर वगैरे रमणीय देखावे पाहावेत. सृष्टीतील भव्य वस्तूंच्या अवलोकनाने व त्यांचे वर्णन वाचण्यानें मनोवृत्तीवर फार उत्कृष्ट परिणाम होतात, हे सर्वास ठाऊक आहे. सुदैवाने ज्यास अनुकूलता असेल त्याने पृथ्वीवरील प्रचंड पर्वत, विशाल नद, अफाट समुद्र, व रमणीय सरोवरे यांचे अवलोकन अवश्य करावे. निदान आपल्या या भरत खंडांत व त्याच्या सीमेवर तसल्या अनेक वस्तु आहेत, त्यांचे तरी अवलोकन अवश्य करावे. हिमालय, विंध्याद्रि वगैरे प्रचंड पर्वत, सिंधु, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, वगैरे विशाल व पवित्र नद्या, व मानस सरोवरासारखीं रमणीय सरोवरे यांचे एकदा तरी अवश्य दर्शन ध्यावे. तसेच रमणीय व कृत्रिम वस्तूंचीही या हिंदुस्थानांत कांहीं वाण नाही. महाराष्ट्रातील रायगड, व प्रतापगडासारखे किल्ल, अग्न्याचा ताजमहाल व विजापूर येथील -
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/102
Appearance