Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९३ ) असे वाटते. अशा घालमेलींत अत्यंत अवश्य वस्तु आपण घ्यावयास विसरतों, व अनावश्यक म्हणजे जरूरी नसणा-या ब-याच वस्तु आपण बरोबर घेतों. आणि मुक्कामीं पहचल्यावर जसजशी अडचण उपस्थित होईल तसतशी एकेकांची आठवण होऊ लागते. मग तेथे कवडीमोल वस्तुलासुद्धा पुष्कळ पैसे देऊन ती विकत घ्यावी लागते. म्हणून प्रवा‘सास निघतांना थोडा बांधाबांधीचा व ओझ्याचा त्रास पडला तरी हरकत नाही. परंतु अत्यावश्यक रोज व्यवहारांत लागणाच्या व ज्यांच्यावांचून आपलें पदोपदी नडेल अशा अवश्यक वस्तु घ्याव्यात. त्या घेण्यांत अगढी हयगय करूं नये. | प्रवासांतील दुसरी अवश्यक गोष्ट म्हटली म्हणजे ज्या ठिकाणी आपणास जावयाचे असेल त्या ठिकाणची संपूर्ण माहिती मिळविणे ही होय, ही माहिती त्या त्या प्रांतांतून व देशांतून परत आलेल्या लोकांकडून मिळवावी. कारण ती त्यांच्याकडून चांगली व अनुभविक मिळते. करितां अशा लोकांना भेटून त्यांजकडून माहिती घ्यावी, अशी प्रत्यक्ष माणसे मिळणे शक्य नसल्यास त्या त्या ठिकाणच्या लोकांना लिहून मागवावी. अगर उपलब्ध पुस्तकांतून काढावी. - ज्या ज्या प्रदेशांतून आपण प्रवास करणार आहों, त्या त्या प्रदेशाचा नकाशा, तेथील लोकांचे आचार विचार व त्यांची नाणी यांची थोडी तरी माहिती करून घ्यावी. व ज्या ज्या प्रांतांतून प्रवास करावयाचा असेल त्या त्या प्रांतां तील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांचे टिप्पण करून घ्यावे.