पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वासोच्छवास बंध होतात. मरणा नंतर ही सर्वांची त्याच्या कडे तिरस्कार नजर असल्यामुळे (कारण नास्तिकाच्या हातून बहूत करून दुसऱ्यास पीडा कारक अशीच कर्मे घडतात ) त्याच्या पाठीमागे निर्देशिवाय दुसरें कांही उरत नाही. आस्तिकाला देव धर्म उपासना कुलाचार यात्रा दान वगैरे क रावी लागतात. ( हा आस्तिकाला तोटा ). ६ आस्तिकाच्या मनाची आपल्या मरणा नंतर आपल्या कर्मा बद्दल परमेश्वरा जवळ जाब द्यावा लागेल अशी खात्री असल्यामुळे सहसा त्याच्या हातून गुप्त ही अचाट घोर कर्मे होत नाहीत. आस्तिकाचे मन भयांत संकटांत मरण काळी त्याचा परमेश्वरा वर विश्वास असल्यामुळे स्थीर असते. ह्यामुळे तो भयांत व संकटांत घाबरत नाही व त्यांतून परमेश्वरावर विश्वास ठेऊन मुक्त होण्यास उपाय करतो ह्या मुळे तो बहुतकरून पार पडतो; व मरण काळी त्याचे मन स्थीर रहाते. कारण त्याला प्रत्येक कर्म करते वेळी आपणास ह्या बद्दल परमेश्वरास जाब द्यावा लागेल अशी भीति असल्यामुळे सहसा त्याच्या हातून अन्याय घडत नाही. ह्या मुळे त्या वेळी ही त्याला दुःख होत नाही व मरणानंतर ही त्याच्या कडे लोकांचे पूज्य अंत करण असते कारण त्याच्या हातून बहूतकरून कोणास पीडा झालेली नसते. ( त्याला फायदा ). र एकंदरीत नास्तिकाजवळ वितडवाद, व आपले मत खरें