पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करण्याकडे सर्व आयुष्याचा व्यय ह्या शिवाय काही नसते. आस्तिकाजवळ मनाची स्थीरता, नम्रता, दुष्कर्माचे भय, ही असल्यामुळे त्याच्या आयुष्याचा आपलें व दुसऱ्याचे कल्याण करण्याकडे व्यय होतो. अस्तोदय. १ चहडतीमध्ये फुगून जाऊं नये कारण ती अशाश्वत आहे ( केव्हां जाईल ह्याचा नेम नाही ). २ पडतीमध्ये नाउमेदीत गर्क होऊ नये, कारण ती कायम राई शकत नाही. पडतीत आपली टेक संभाळून रहाणे कठीण आहे. ४ चहडतीमध्ये सम [ मध्यम ] रहाणे फारच कठीण आहे. ५ पडतीमध्ये मनुष्याचे चांगले स्वभाव दिसून येतात. ६ चहडतीमध्ये मनुष्याच्या अंगी वाईट गुण उप्तन्न होतात. ७ पडतीमध्ये आपली बुध्दि व नजर तीक्ष्ण होते, कारण आपणास खरे खोटे समजण्याचीच ती वेळ आहे. या ४ चहडतीमध्ये आपण आपल्या शुध्द बुध्दीची पर्वा बाळगीत नाही, व आपल्या दृष्टी समोर खुशामतीचे व अभिमानाचे पडदे पडतात कारण आपणास बुध्दीची गरज पडत नाहीं व लक्ष्मी बरोबर तिचे परम मित्र ( आपले परम शत्रु ) अभिमान