पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आस्तिक ह्मणजे जे आपणास प्रत्यक्ष दिसते किंवा ज्याचा आपणावर प्रत्यक्ष बोध होतो व ज्यांस नांव आहे त्या शिवाय ही दुसरा कोणी आपला व त्या सर्वाचा उत्पन्नकर्ता पालनकर्ता व संव्हार कर्ता एक आहे. [ झणजे ज्याला आपण परमेश्वर ह्मणतो तो ] असे मानणारे. २ नास्तिकाला में प्रत्यक्ष दिसते किंवा ज्याचे प्रत्यक्ष अ स्तित्व ज्यांच्या मनावर ठसते त्या शिवाय कोणी नाही असे त्याचे मत असल्यामुळे त्याला देव धर्म पूजा अर्चा उपासना नवस दान वगैरे काही करण्याचे कारण नसते. यास्तव परियायाने होणारा सहज परोपकार त्याच्या हातून होत नाही. आस्तिकास आपल्या कर्मा बद्दल आपणास पुढे मरणानंतर जाब द्यावयाचा आहे. परंतु नास्तिकास तले नसल्यामुळे जगा पुढे न येईल अशी सावधगिरी ठेऊन त्याचे मन कोणतेही नीच किंवा वाईट कर्म करण्यास आचका खात नाही ह्यामुळे नास्तिक समाजबंधूस किंवा जगतास अहित कर होत. नास्तिकास मरणाच्या काळी त्याच्या मनाचा विश्वास नसल्या मुळे त्याचे मन स्थीर रहात नाही व स्थीरता नाही तेथे चैन किंवा सुख कोठून ? ह्या वरून मरणकाळा पर्यंत त्याचे मन संसारविचारांत मग्न असल्यामुळे त्याला स्थीरता किंवा सुख नसते वः मरणकाळी त्याला आपल्या कर्मा बदल पश्चात्ताप व भय उत्पन्न होऊन त्याचा जीव घाबरतो त्याच्या सर्वांगाला कापरें सुटते व हाय हाय करिता दुःखांतल्या दुःखांत त्याचे