पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुरून कामा पुरते बोलावे व कधीही त्यांच्याशी खेळू नये व त्यांच्यांशी एकांती बसू नये. १७ मुलाने पाहिले ते घरांत मागू नये. १८ मुलाने चाकर माणसांशी खेळू नये व कामावांचून फार बोलू नये तसेंच अपशब्द बोलू नये व मारूं नये. १९ मुलाने आपल्याला योग्य व सुशील मुलाची सोबत करावी. २० मुलाने आपल्या घरच्या माणसांना विचारल्या वांचून कांहीं करू नये. २१ मलाने अयोग्य हट्ट घेऊन घरच्या माणसाना त्रास देऊ नये... २२ मुलाने पहाटेस उठून नित्य नियमाप्रमाणे शौच्य मुखमार्जन करून अक्षर वळविण्यास बसावे किंवा इतर अभ्यास करावा कारण प्राप्तः काळी स्मरण व वर्तन जास्त दृढतर होत अप्सतें.. २३ मुलाने पथारीतून उठल्या बरोबर व निजतांना परमेश्वराची अनन्यभावें प्रार्थना करावी. २४ स्नान केल्यावर भोजन करावे. जेवतांना उगाच बोलं नये किंवा हांसू नये. २६ जेवल्यावर मुलाने शाळेत जावें विद्यलयांत जातांना कोणाच्या खोडाळ्या काढूं नये व कांहीं पहात उभे राहूं नये. शाळेत गेल्यावर मुलाने आपल्या अभ्यासाकडे लक्ष लावावें कारण ती वेळ शिकण्याची आहे. २० शाळेत शिक्षक जे काही सांगेल ते मुलाने आपल्या स्मरण वहीत उतरून घ्यावे व घरी आपल्यावर ते पाठ करून चां-- आया वहीत शाईने लिहून ठेवावे व त्याची नित्यशःपुनरा. वृत्ति करीत असावे.