पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या अभ्यासांत किंवा त्याचे मन रंजविण्यांत मदत करावी. ३ मुलाने आपणाला जे काही मिळेल त्यांत आपल्या भावाला वा टून देऊन व आपण खाऊन संतोष मानावा. मुलाने आपल्या वडिलांची अगर ज्यांच्या येथे तो असेल त्यांची, परम पूज्य गुरूची व जो कोणी आपल्या फायद्याचे सांगेल त्याची आज्ञा मान्य करावी. ५ मुलाने कधहि मोठ्या माणसाशी तकरार करूं नये. ६ मुलाने सर्वाशी विनयाने व गोड बोलावे, आणि सर्वांशी मिळून राहावे. ७ मुलाने खोटे बोलून आपला अपराध कधीही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करूं नये, ८ मुलाने खोटें न बोलण्या विषयी प्रयत्न करावा ह्मणजे सहसा अपराध होणार नाही, ९ मुलाने कधीही स्वतंत्रपणाने निष्काळजीनें अव्यवस्थेनें वर्त नये व अपरात्री बाहेर फिरण्यास निघू नये. १० मुलाने गाणेबजावणे ( अनीतीचे ) तमासे व नाटके वगैरे पाहाण्याची चट ठेऊ नये. ११ मुलाने जुगार खेळू नये व्यसन करूं नये, १२ मुलाने पैशाचा लोभ करूं नये. १३ मुलानें कोणाच्या घरी कामा वांचून जाऊं नये. १४ मुलाने वाईट मुलाची सोबत करूं नये. १५ मुलाने अहारावर किंवा जेवल्यावर पुन्हां जेवू नये. १६ मुलाने मुलींशी कामा वांचून बोलूं नये व बोलणे झाले तर