पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्या अविचारी उतावीळ व बेपर्वाईपणा बद्दल पश्चात्ताप क रण्याची वेळ न येईल. १३ तरुण मनुष्याने वडीलाशी अवश्य नम्रतेने वागावे किं त्यांचा कोणी अपमान न करील. १४ तरुण मनुष्याने अतिशय जागू नये. की त्याची प्रकृति बिघडेल, १५ तरुण मनुष्याने आळस टाकून उद्योग व श्रम करावे कारण दुसऱ्याचे पोषण व संरक्षण करण्याचा त्याच्यावर बोजा आहे. १६ तरुण मनुष्याने आपल्याच्यानें बनेल तोपर्यंत दुसऱ्यावर उपकार करावा (सुख द्यावे ) कारण पुढे त्याला दुसऱ्याच्या उपकाराची गरज पडणार आहे. १७ तरुण मनुष्याने जन व देश कल्याणाची कामे करावी कारण त्याला कीर्ति संपादन करण्याची ती वेळ आहे. १८ तरुण मनुष्याने निराश किंवा उदास होऊ नये कारण पुढे त्या पासून उद्योग श्रम आशा इत्यादिकाचा झरा बंद पडणार आहे. बाळधर्म. १ वाळकाळ ह्मणजे दुसऱ्यांच्या संरक्षणांत राहून त्यांच्या आज्ञेत वागून ज्ञानसंपादन करून घेण्याची वेळ... २ मुलाने आपल्या लहान भावंडांवर सक्ती न करितां त्याला त्या