पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपले मुख्य कर्तव्य करण्या पासून अंतरतो. ४. ज्वान मनुष्याने आपला परिणाम व स्थिति ह्या विषयी विचार करावा की पुढे दुःख न होईल.. ५ तरुण मनुष्याने पैसा फारच जपून वापरावा की पुढे वृध्दापका ळी अडचण न पडेल. मनुष्याला ज्या वेळेस असे वाटेल की हे भाऊ वगेरे कोणी आपल्या उपयोगी पडणार नाहीत त्या वेळेस त्याने असा ही विचार करावा की ही बायका मुले आपल्याला उपयोगी पड-- तील हे तरी कशा करून? जर. मनुष्याला त्याच्या घरांतील. कंकास विझविण्याची इच्छा असेल तर त्याने आपले दोन्ही ओठ एकमेकाला चिकटवून ठेवावे.. तरुण मनुष्याला कुटुंबांत राहावयाचे असेल तर त्याला काही गोष्टी विषयी काना डोळा किंवा हेळसांड करावी लागेल व दुसऱ्याचा दोष मागच्या पडशीत व आपला पुढच्यात घालावा लागेल. ९. मनुष्याला किती ही काम भय ऋण दुःख असले तत्रापि, त्या ने आपल्या मनाची शांतता ठेवावी की तो निभावला जाईल. १० तरुण मनुष्याने बायकोवर प्रीति ठेवावी पण तिच्या कब ज्यांत जाऊ नये. ११ मनुष्याने मुलावर ममता ठेवावी पण त्याला आपली मर्यादा उल्लंघन करण्याची वेळ येऊ देऊ नये. १२ तरुण मनुष्याने प्रत्येक काम करते वेळेस ईश्वरा कडे पाहून करावे म्हणजे योग्य अयोग्य ह्याचा विचार करावा की आप