पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याच्या विषयी कोणाच्या मनांत वाइट न येईल. ९ वृध्दमनुष्याने वडीलपणा फार मिरवू नये की दुसरे त्यांचा अपमान करण्यास तैयार होतील. १० वृध्दमनुष्याने सार्वजनिक उपयोगी कामांत आपल्या आयुष्या चा कांही वेळ तरी खर्च करावा की जगाला त्याचे आयुष्य किमती होईल. ११ वृध्दमनुष्याने स्वतःचा पैसा स्वतःच्या ताब्यात ठेवावा की त्याची आज्ञा उल्लंघन न होईल. १२ वृध्दमनुष्याने आहारांत वगैरे जपून वागावे की त्याच्या आयुष्याचे मागले दिवस सुखांत जातील. योवन धर्म. १ योवन काळ ह्मणजे वृध्द बाळ स्त्री व अनाथ ह्यांचे रक्षण करून ( पोषण ) आपल्या वृद्धापकाळा साठी धन संपादन व स्वदेश कल्याणाची कामे करण्याची वेळ. तरुण मनुष्याने बढाईच्या गोष्टी करू नये कारण तो काम करण्यास समर्थ आहे. ३ तरुण मनुष्याने अति ममता करू नये कारण त्या पासून तो