पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९ १९ राजानें हरएक कामाचा तपास केल्यावर त्या कामाचा ठराव करावा. की सहसा अन्याय न होईल. २० राजाने फिर्याद ऐकण्यांत कंटाळा किंवा त्रास करूं नये की जुलमी फावले जातील. २१ राजाने आवका पेक्षा जास्त खर्च न करावा की प्रजाजनांला जास्त कराच्या बोजाखाली टाकण्याचा प्रसंग न येईल. २२ राजाने स्वकीय बलाबल पाहून कार्य करावें की संकट प्राप्त न होईल. २३ राजाने कार्य करण्यांत त्याचा अगोदर परिणाम नड उपाय शक्य अशक्य ह्याचा विचार करावा की पश्चात्ताप न होईल. . २४ राजाने स्वकीयांनां साम दाम भेद दंड याही करून ताब्यांत ठेवावें की फूट न होईल. २५ राजाने परस्थळ परदेश व स्वराज्यांत विश्वासू व गुप्त बातमी दार ठेवावें की आपणाला संकटां पासून सावध होऊन उपाय करण्यास वेळ सांपडेल. प्रजाधम. प्रजा ह्मणजे तिचें जो पालन करील त्याला स्वसंरक्षणाप्रित्यर्थ आपल्या उप्तन्नाचा नियमित हिसा देऊन त्याच्या आज्ञेत राहीतील.