पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ ल्याने ते आपल्या नृपाळाचे नित्यशः कल्याण चिंततील. ९ राजाने निर्बळांचे रक्षण करावे किं त्याचे वजन वाढेल. १० राजाने शरणागतांनां अभय द्यावे की त्यांचे रक्षण होऊन कि ति होईल. ११ राजाने राजकार्यात विचारीपणा ठेवावा की ते पार पडेल. १२ राजाने राजकार्यात दूर दृष्टि ठेवावी की,चुकीचा भयंकर परि णाम न होईल. १३ राजाने बोलण्यांत माधुर्य ठेवावें की तो लोकप्रीय होईल. १४ राजाने द्रव्य व राज्य वाढविण्याविषयी उत्सुकता ठेवावी की आपणालाही फायदा होऊन बुद्धिमान् पुरुष वर तरून येतील. १५ राजाने वृद्ध विद्वान् साधु गुरु वडील ह्यांच्या ठिकाणी नम्र असावे किं आपल्या ज्ञानाची वृद्धि होऊन त्याचा मान राही ल्याने ते ही संतुष्ट राहतील. १६ राजाने व्यापार कला कौशल्य वृध्दिगत करण्यांत सहाय्य करावें की देश सधन होईल. १७ राजाने विद्येविषयी अभिलाष ठेवावा की त्याची वृध्दि होऊन प्रजा अज्ञानापासून मुक्त होईल. १८ राजाने प्रजेच्या कल्याणाविषयीं हर प्रयत्नाने उपाय करावें की आपल्या राज्यांतील अनेक अन्याय नाहीसे होतील.